adv

समता पर्व : 'महात्मा जोतीबा फुले अणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सयुक्त जयंती महोत्सव २०२३'


समता पर्व : 'महात्मा जोतीबा फुले अणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सयुक्त जयंती महोत्सव २०२३'






मूळजी जेठा  महाविद्यालयात 11 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत आपण  समता पर्व साजरा करीत आहोत.

या समता पर्वामध्ये पुढील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 11 एप्रिल रोजी महात्मा जोतीबा फुले याना अभिवादन आणि व्याख्यान होईल.
    • स्थळ : जुना कॉन्फेरेन्स हॉल , वेळ : सकाळी ९:३० .
  • 12 एप्रिल रोजी परिवर्तानाच्या कविता आणि गाणी होतील . यात दलित साहित्यातले नामांकित कवींच्या कविता वाचन व भीम गीत गायन होईल.
    • स्थळ : जुना कॉन्फेरेन्स हॉल , वेळ : सकाळी १०:००.


  • 13 एप्रिल रोजी '१५ तास अभ्यास अभियान'  चे आयोजन करण्यात आलेले आहे. यात सकाळी 7 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यासाकरिता बसणार आहेत.( विद्यार्थी कोणत्याही विषयाचा अभ्यास वर उल्लेखित केलेला कार्यक्रमात करू शकतात.) रात्री ठीक अकरा वाजेला '15 तास अभ्यास अभियान'  या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी मशाल घेऊन रेल्वे स्टेशन जवळील  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन करतील व तिथे कार्यक्रमाची सांगता होईल.
    • स्थळ : मुख्य ग्रंथालय , वेळ : सकाळी ०७:००.ते रात्री १२.००
    • या अभियानात सहभागी विद्यार्थ्याना महात्मा जोतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येकी एक पुस्तक विद्यार्थ्यांना वाचायला देण्यात येणार आहे.
    • या अभियानात सहभागी विद्यार्थ्याना सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण देण्यात येणार आहे.
    • जे विद्यार्थी सलग अभ्यास करतील (मध्यांतर वगळता ) त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
    • सर्व सहभागी विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
    • या अभियानात सहभागी होण्याकरीता पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी प्रक्रिया राज्यशास्त्र विभाग येथे केली जाईल. (अविनाश -7391922728,9373676410) किंवा खालील लिंक ला क्लिक करुन नाव नोदवता येईल. https://forms.gle/NDJ4NCeNBwWc6QNi6
  • 14 एप्रिल रोजी महात्मा जोतीबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जीवन कार्यवार आधारित 'समता पर्व बहुपर्यायी परीक्षा' घेण्यात येणार आहे. या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्याना पारितोषिक दिले जाणार आहे .
    • स्थळ : कंप्यूटर लैब, संगणक शास्त्र विभाग, चौथा मजला , सायन्स बिल्डिंग.  वेळ : सकाळी 9 ते 10.
  • 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन आणि व्याख्यान होईल.
    • स्थळ : जुना कॉन्फेरेन्स हॉल , वेळ : सकाळी १०:००
  • 14 एप्रिल रोजी पारितोषिक वितरण समारंभ होईल. यात समता पर्वात ('१५ तास अभ्यास अभियान')  सहभागी  विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व 'समता पर्व बहुपर्यायी परीक्षेतील विजेते याना  पारितोषिकांच वितरण मान्यवरांच्या  हस्ते  करण्यात येईल.
    • स्थळ : जुना कॉन्फेरेन्स हॉल , वेळ : सकाळी ११:००

'समता पर्व' यात अधिकाधिक विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे.

समता पर्व : 'महात्मा जोतीबा फुले अणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सयुक्त जयंती महोत्सव २०२३' समता पर्व : 'महात्मा जोतीबा फुले अणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सयुक्त जयंती महोत्सव २०२३' Reviewed by Rajiv Pawar on 4:51 PM Rating: 5

No comments:

Powered by Blogger.