adv

CI -VEC- 121 Constitution of India (भारताचे संविधान ) Internal Exam

 

नवीन शैक्षणिक धोरण -2020 नुसार सर्व शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी प्रथम सत्रात पर्यावरण शास्त्र( Environmental Science)  या विषयाचा अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे द्वितीय सत्राकरीता CI -VEC- 121 Constitution of India (' भारताचे संविधान ') हा विषय सर्व शाखेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना अभ्यासायचा आहे.  हा पेपर प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राकरीत लागू करण्यात आला आहे. पेपर दोन क्रेडिट म्हणजेच 50 गुणांचा आहे. यात 20 गुणांची अंतर्गत चाचणी व 30 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे. 20 गुणांची अंतर्गत परीक्षा Assianment स्वरूपाची असेल. अधिकचा तपशील पुढील प्रमाणे.

(पोस्टर जमा करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2024)

(विद्यार्थी यांनी केलेल्या विनतीमुळे अंतिम दिनांक वाढवण्यात आला आहे. ही शेवटची संधी आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही.)  

  • अंतर्गत चाचणी परीक्षेकरीता प्रत्येक विद्यार्थ्यास पुढील पैकी कोणत्याही एका घटकावर 12 x16 (Inch) किंवा रेग्युलर कार्डशीट आकाराचे पोस्टर बनवायचे आहे. ( पोस्टर करीता विषय (Topic for Poster)
  • पोस्टर डिजिटल किंवा कार्डशीट वर असावे. 
  • पोस्टर वर स्वतःचे नाव , वर्ग नमूद करावा. (Right side of the bottom)
  • पोस्टर करीता निवडलेल्या विषयाची विस्तृत माहिती देणारे पोस्टर तयार करावे. केवळ फोटो चे कोलाज केलेले पोस्टर ग्राह्य धरले जाणार नाही. 
  • पोस्टर प्रत्यक्ष (हार्डकॉपी) जमा करू शकतात किंवा पुढील लिंक वर अपलोड करू शकतात. 
  • डिजिटल पोस्टर अपलोड करण्याकरिता लिंक : https://forms.gle/4XwXmXDvosC3dEKz8 (फाइल pdf/jpg/jpeg स्वरूपाची असावी)
  • पोस्टर प्रत्यक्ष (हार्डकॉपी) स्वरूपात जमा करावयाचे असल्यास राज्यशास्त्र विभागात (Department of Political Science, Humanities Building) सकाळी 09 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जमा करावे. 
  • पोस्टर स्वत:ची कल्पकता वापरुन करावयाचे आहे.  इंटरनेट वरून जसेच्या तसे डाउनलोड केलेले पोस्टर ल गुण दिले जाणार नाही. तसे आढळल्यास तो विद्यार्थी अंतर्गत चाचणी परीक्षेत नापास होऊ शकतो. याची सर्व विदयार्थ्यानी नोंद घ्यावी. 
  • डिजिटल पोस्टर कसे बनवावे याकरिता मार्गदर्शनपर विडियो लिंक खाली देण्यात आली आहे.
  • Poster by Power Point 
  • Poster by Canva
(विद्यार्थी कोणतेही App/Software वापरुन पोस्टर बनवू शकतात.)

CI -VEC- 121 Constitution of India (भारताचे संविधान ) Internal Exam CI -VEC- 121 Constitution of India (भारताचे संविधान ) Internal Exam Reviewed by Rajiv Pawar on 12:44 PM Rating: 5

No comments:

Powered by Blogger.